Thursday, September 27, 2018

What we should learn from Elon Musk (marathi)


“नवउद्योजक आणि आपण सर्वांनी इलॉन मस्क यांच्याकडून काय शिकावे?”
-Prudy Gourguechon
(या लेखिकेने फोर्ब्स या मासिकात लिहिलेल्या लेखाचे माझ्या क्षमते नुसार केलेले मराठीतले  भाषांतर )

आजच्या TIME मासिका साठीच्या  इलॉन मस्क यांच्या अप्रतिम मुलाखती मधे ज्या संवेदनशीलतेचा मस्क यांनी  खुलासा केलेला आहे त्यातून दोन मोठ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
  1. आपण सर्वानी मोठं झाला पाहिजे (आणि मी येथे मस्क  यांच्या बद्दल बोलत नाहीये )
  2. प्रत्येकाला , म्हणजे दूरदृष्टे, नायके , नवउद्योजक , CEO, यांना आपापल्या उणिवांची (संवेदनशीलतेचा) (जी प्रत्येकात असते ) जाणीव असली पाहिजे आणि त्या वर  आपण विशिष्ट ,संबंधित ,ठोस क्रिया केली पाहिजे जी आपल्याला व आपल्या व्यवसायाला संरक्षित करू शकते. 
टाईम मासिकाच्या मुलाखतीत मस्क विलक्षण भावनिक आणि संवेदनशील झाले  होते. ते म्हणतात गेले वर्ष हे भावनिक दृष्ट्या पिळवटून टाकणारे होते . ते आपल्या अकल्पनीय आणि थकवणाऱ्या जादा काम आणि कमी झोपेच्या वेळापत्रकाबद्दल बोलले. त्यांनी  विश्लेषकांच्या प्रश्नांना “कंटाळवाणे आणि अनावश्यकप्रश्न ” म्हटल्यावर व विशेषतः ७ ऑगस्ट ला त्यांनी अतिशय वादग्रस्त व शेअर मार्केट हादरवणारे ट्विट - टेस्ला मोटर्स लिमिटेड कंपनी करण्या संद्रभातले , केल्यावर  त्यांची निर्णय क्षमता आणि आत्मनिग्रह (self-control) या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. “त्याने मुलाखती दरम्यान स्वकृत्यांबद्दल असामान्य दर्जाचे गंभीर विचार आणि संवेदनशीलता दाखवली ” या टाइम मासिकच्या नोंदीशी मी सहमत आहे.

मस्क यांनी प्रशंसा आणि द्वेष यांच्या तीव्र भावना  दीर्घ काळपर्यंत व्यक्त केल्या आहेत, विशेषतः सर्वसामान्य लोकांना  आणि माध्यमांना अविरत पणे उत्तरं किंवा टिप्पणी देताना. त्याच्या अश्या सार्वजनिक पणे भावनिक प्रतिसाद देण्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे त्याचे संवेदनशील असणे  होय. अशी संवेदनशीलता आज कालच्या CEO मध्ये अभावानेच आढळते.

आपण सर्वानी मोठं झाले पाहिजे

त्याचे आणखी एक कारण  आहे . मस्क यांचे कर्तृत्व अगाध आहे. ते चमत्कारांवर विश्वास ठेवतात आणि कधी कधी चमत्कार घडवूनही आणतात. “कारा स्वीशर ” यांनी नुकत्याच लिहिलेल्या अंतर्मुख करणाऱ्या लेखात म्हणलं  आहे कि , “सिलिकॉन व्याली ला अशा क्लिष्ट देवांची गरज आहे.” ती जबाबदारी स्टिव्ह जॉब्स यांनी बराच काळ निभावली आणि त्यांच्या निधन नंतर त्या पोकळीत इलॉन मस्क विराजमान झाले आहेत. स्वीशर लिहितात, सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींच्या  थोर निर्मात्यांन मध्ये निर्मितिक्षम विनाशकता (Creative Destruction) सामाईक  आढळते. फक्त सिलिकॉन व्याली लाच देवांची आणि नायकांची गरज असते असं नाही तर आपण सर्वांनाही असते. आणि आपण त्यांना त्याच निर्मितिक्षम विनाशकते (Creative Destruction) चा वापर करून  त्यांच्या सर्वसामान्यांप्रमाणे वागण्याला, त्यांच्या गर्विष्ठ वागण्याला , त्यांच्या गोंधळलेपणाला, त्यांच्या आपल्याला नाराज करण्याला किंवा पुरेसं  देवा सारखा न वागू शकण्याला दोषारोप देतो.

हा दैवी लोकांना दिला जाणारा प्रतिसाद मानवी मानवशास्त्रीय विकासातली सार्वत्रीक प्रक्रिया दर्शवते. लहानपणी आपण आपल्या आई वडिलांना सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञानी समजतो. आपल्याला या  कल्पनेत जगायचं असतं कि ज्या मुळे आपल्याला या जगात सुरक्षित वाटेल. आपल्याला या भ्रमाची जगात सुरक्षित असल्याचा अनुभव घेण्यासाठी गरज असते, कारण आपण लहान असल्या मुळे परिस्थितीला सामोरं जाण्यास सक्षम आहोत असे आपल्याला वाटत नाही . जस जशी आपल्याला त्यांच्यातल्या दोष आणि उणिवांची जाणीव  होते तसतसे आपल्या भ्रमाचा भोपळा फुटतो. त्यामुळे किशोरवयीन मुले आपल्या आदर्श नसणाऱ्या पालकांऐवजी रॉकस्टार , खेळाडू, अभिनेते यांना त्यांच्यातील दोषांना दुर्लक्षुन आदर्श मानतात.

या रागआणणाऱ्या मोहभंगातून सावरन्याची क्षमता असणे आणि पुन्हा लोकांची प्रशंसा करण्याची क्षमता विकसित करणे  व अतिशय कर्तृत्वान व उल्लेखनीय लोक सूध्दा शेवटी माणूसच आहे हे मान्य करणे म्हणजे परिपक्वता दाखवणे होय.

आणखी एक सार्वत्रिक मनोवैज्ञानिक घटना येथे संबंधित बनते. माणूस म्हणून, आपल्याकडे  दोन पाऊले मागे येण्याची क्षमता आहे - म्हणजे तात्पुरतं मनोविकास आणि कार्यपद्धतीतल्या  आधीच्या टप्प्यांवर येणे. हे मागे येणं तणाव आणि थकव्याच्या काळात होण्याची जास्त शक्यता आहे. मी असं म्हणेन कि इथे सामूहिक मनोवैज्ञानिक घटना चालू आहे. आपण अतिशय तीव्र तणावाच्या आणि भयानक अनिश्चिततेच्या काळात जगात आहोत.  बहुतेक वेळा आपल्यात परिस्थिती हाताळण्याची क्षमतेची पात्रता कमी असते. म्हणून लहान मुलाप्रमाणे आपल्याला नायक आणि रक्षणकर्त्याची गरज भासते आणि त्यांनी आपल्याला निराश केल्यावर आपण किशोरवयीन मुलांप्रमाणे त्यांच्यावर हल्ला चढवण्याची शक्यता असते.

मस्क  हे सर्वशक्तिमान नायक असल्या सारखे आहेत. मी शिकागो मध्ये राहते. ते इथे दोन महिन्यांपूर्वी आले आणि विमानतळावर कमीत कमी वेळेत नेणाऱ्या अतिशय वेगवान बोगद्याचे आश्वासन देऊन गेले. ते अतिशय चित्तथरारक होतं. मस्क यांच्या जादूने आपण शहराखालून, कुठल्याही अडचणी शिवाय , खात्रीशीररित्या ,  ताशी १६० किमी वेगाने विमानतळावर पोहचू शकतो.

चला आपण हे मान्य करूया कि आपले नायक हे माणूस आहेत. कदाचित तो बोगदा कधीच बनणार नाही, पण मला त्या दूरदृष्ट्या माणसाने दाखवलेली कल्पना खूप आवडली.

नायक आणि CEO यांना देखील आपल्या मानवी गरजांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मस्क यांची मुलाखत वाचल्यावर मला माझी मनोविकासतज्ञाची काल्पनिक विचार टोपी घालावीशी वाटली नाही. जसं स्वीशर लिहितात , “मस्क महोदयांचे मन आणि कल्पना या खूप मोठ्या आहेत.” . आणि ते वेडे नाहीयेत, पण माणूस मात्र नक्कीच आहेत. या मुलाखतीने मात्र  मला आईची आणि डॉक्टरांची काल्पनिक वैचारिक टोपी घालावीशी वाटते, आणि खालील सूचनांचा महान नेत्यांनी आणि दूरदृष्ट्या लोकांसकट सर्वांनी नोंद घ्यावी असे वाटते.
  1. आपण पुरेशी झोप न घेता कार्य करू शकत नाही
  2. आपण ब्रेकशिवाय कार्य करू शकत नाही.
  3. काही ठराविक लोकांवर विश्वास ठेवा. तुम्हाला असा कोणावर तरी विश्वास ठेवावा लागेल जो तुमची जागा घेऊ शकतो आणि तुमचे काम इतके व्यवस्थित करु शकतो कि तुम्ही ब्रेक घेऊ शकता , तुम्ही झोपू शकता , तुमचा मुलाबाळांना आणि घरच्यांना वेळ देऊ शकता आणि  सुट्टीवर जाऊ शकता. तुम्हाला अशाही विश्वासु मार्गदर्शकाची गरज आहे ज्याच्याशी तुम्ही अनिश्चिततेच्या काळात किंवा अति कामाच्या ओझ्या खाली दाबून गेलेले असताना मोकळेपणाने बोलू शकता. आणि तुम्हाला अशा विश्वासु व्यक्तीची गरज आहे कि जो तुम्हाला तुम्ही थांबणे गरजेचे असल्यावर बिनदिक्कत थांबण्यास सांगू शकतो. अशाप्रकारे तुम्हाला कमीतकमी ३ विश्वासु लोकांची आवश्यकता आहे. 
  4. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल कि जिथे तुम्ही सर्वोत्तम काम करू शकत नाही आहात - (हे प्रत्येकाच्या आयुष्यात होते. ) अशा वेळा ओळखायला शिका आणि अशी स्वयंशिस्त बाळगा कि या दरम्यान कुठलेही महत्वाचे व दूरगामी  निर्णय, घेणे तो पर्यंत टाळा जो पर्यंत तुम्ही तुमच्या उत्तम कार्यक्षमतेला पुन्हा येत नाही. 
  5. आपली प्राथमिक काळजी घेण्यासाठी एक डॉक्टर निवडा आणि वर्षातून कमीतकमी एकदा त्याला भेटा आणि त्यांचा सल्ला माना. 
  6. स्वतःचे  अतिरिक्त माहितीच्या ओझ्या पासून संरक्षण करा.  विशेषतः तुमच्या बद्दलच्या अनोळखी व्यक्तीने केलेल्या  नकारात्मक , निरर्थक, आणि वाईट टिप्पणी पासून. 
  7. वेळेवर खाण्या पिण्यास विसरू नका. 
——————-
Prudy Gourguechon या एक मानसोपचार तज्ञ आणि मनोविश्लेषक आहेत. ज्या वित्त आणि व्यवसाय महत्वपूर्ण निर्णया मागच्या  मूलभूत मानसशास्त्रावर त्या क्षेत्रातील नेत्यांना मार्गदर्शन करतात.
भाषांतर :- सुधीर ससाणे

Friday, September 21, 2018

Three Common Myths of Entrepreneurship

Three Common Myths of Entrepreneurship
नवउद्दोजकते बाबतची सर्वसामान्य ३ मिथके

Excerpt from book “Disciplined Entrepreneurship” by Bill Aullet

भाषांतर :- सुधीर ससाणे


१. नवउद्योजक होणे हे एकट्यानेच करायचे  काम आहे.

एकट्या माणसाने उद्योग करून यश संपादन केलं असा सर्वत्र आपण ऐकतो पण संशोधन पर निबंधाचा बारकाईने अभ्यास केल्यास असे
दिसते कि उद्योग सुरु करण्यास  चांगल्या संघाची (group) ची आवश्यकता असते. महत्वाचे म्हणजे मोठा संघ असेल तर यश
मिळण्याची शक्यता वाढते. जास्त संस्थापक = यशाची शक्यता अधिक

२. सर्व नवउद्योजक जादुई  व्यक्तिमत्वाचे असतात आणि त्याचाच त्यांच्या यशात सिंहाचा वाट असतो.

वास्तविक पाहता जादुई व्यक्तिमत्व काही काळ प्रभावी ठरू शकते, पण त्याने व्यवसायात जास्तवेळ तग  धरता येणं अवघड आहे.
त्याऐवजी संशोधन असे सांगते कि जादुई व्यक्तिमत्व पेक्षा नवउद्योजकाला एक प्रभावी संवाददाता, कामासाठी चांगली लोकं
 निवडू शकणारा, आणि उत्कृष्ट विक्रेता असणं  अधिक महत्वाचं आहे.

३. तुमच्या रक्तातच उद्योजकता असली पाहिजे.

तिसरे मिथक नवउद्योजकतेचा जीन (Entrepreneurship Gene). असं मनाला जातं कि काही लोकांच्यात  यशस्वी रित्या कंपन्या
सुरु करणे अनुवांशिक असतं. वास्तविक पाहता असा जिन सापडला नाहीये आणि सापडणारंही  नाही. काहीजण असा विश्वास करतात
की भपकेबाजपणा  किंवा धाडसीपणासारखे व्यक्तिमत्त्व गुण यशस्वी उद्योजकतेशी संबंधित आहेत, परंतु त्या विचारांची दिशा चुकीची आहे.
त्याऐवजी वास्तविक कौशल्ये आहेत जी यशाची शक्यता वाढवतात, जसे कि लोकांचे व्यवस्थापन, विक्री कौशल्य , उत्पादन संकल्पना,
वितरण. हि कौशल्ये शिकता येऊ शकतात. ती काही भाग्यवान लोकांना अनुवांशिक दृष्ट्या भेट मिळालेली नसतात. लोकं नवीन वर्तवणूक
शिकु शकतात  आणि तिच्याशी जुळवुन घेऊ शकतात. आणि म्हणूनच नवउद्योजकता हि अशा वेगवेगळ्या स्वतंत्र वागणुकी मध्ये आणि
प्रक्रियांमध्ये विघटित केली जाऊ शकते, जी शिकवली जाऊ शकतात.